हाथरस प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी; योगी आदित्यनाथ यांनी दिला आदेश

लखनौ : उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील युवतीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिले. सध्या हे प्रकरण देशभरात गाजते आहे. उत्तरप्रदेश सरकारवर याबाबत टीका होते आहे. या अगोदर आज उत्तरप्रदेशच्या गृह विभागाचे अपर  मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली.

दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले. नंतर त्यांनी पत्रकाराना सांगितले की, या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जबाबदेखील नोंदवून घेण्यात आलेले आहे. असे या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी म्हणाले होते. यानंतर काँग्रेस नेते राहुल व प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही.

काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. या अगोदर हाथरस घटनेवर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, उत्तरप्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल.  उत्तरप्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER