प्रशंसनीय मुख्यमंत्री: रस्ता रुंदीकरणासाठी स्वत: च्या मंदिराची पाडली भिंत

Yogi Adityanath

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा सांगितले की कर्तव्य म्हणजे काय असते? गोरखपूर ते सोनौली या चौपदरीकरणासाठी त्यांनी गोरखनाथ मंदिराची भिंत पाडली आणि इतरांनाएक चांगला संदेश दिला. कोणीही विकासाच्या मार्गात आड येऊ नये हा संदेश त्यांनी यामाध्यमातून दिला आहे.

अलीकडच्या काळात ही दुसरी वेळ आहे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपली वेगळीच छवी निर्माण केली आहे. या अगोदर ते आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनास गेले नव्हते. आणि राजधर्म कसा पाळायचा असतो? ते दाखवून दिले. प्रसिद्ध गोरखनाथ मंदिर उत्तर भारतातील प्रमुख मंदिरांमध्ये मोजले जाते. हे कोट्यावधी लोकांच्या श्रध्येचे केंद्र आहे. हे नाथपंथियांचे मुख्यालय असून, याचा संबंध थेट योगी यांच्यासोबत आहे. ते गोरक्षपीठचे पीठाधीश्वरही आहे.

मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी मंदिराची भिंत पाडण्याचे आदेश दिले जेणेकरून गोरखपूर चौपदरीकरणात येणाऱ्या कोणत्याही घर किंवा दुकान मालकाने आक्षेप घ्यायला नको. दुकाने आणि घरे पाडल्यामुळे, बया गोरखनाथ मंदिर, धर्मशाला, मोहदीपूर, कुडाघाट आणि नंदनगर मार्गे विमानतळावर येणे सोपे होईल. मुख्यमंत्री झाल्यावर आणि खासदार म्हणून त्यांनी वारंवार सांगितले की, जनहित आणि विकास हे एकमेकांचे पूरक आहेत. यात कोणताही अडथळा मान्य नाही. विकास हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे लोक कल्याणासाठी कर्तव्य आहे. मुख्यमंत्री योगी हेदेखील सातत्याने सिद्ध हेच करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला