योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट; यूपीत राजकीय हालचालींना वेग

Amit Shah - Yogi Adityanath - Maharashtra Today

उत्तर प्रदेश : युपीमध्ये काही दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यानंतर ते उद्या पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेणार आहेत. जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री योगी दिल्लीत गेल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.

दरम्यान, खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला जास्त स्थान मिळावे, यासाठी त्या आग्रही आहेत. त्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करून दोन मंत्रीपदे द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या यूपी मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला एक राज्यमंत्रिपद दिले आहे. जयकिशन जॅकी यांच्याकडे जेल राज्यमंत्रिपद आहे.

दुसरीकडे, भाजपाचे प्रभारी राधामोहन सिंह यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले होते. आता योगी आदित्यनाथ दिल्लीत गेल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि आरएसएस नेत्यांमध्ये बैठकाही सुरू आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button