आ. कदम यांचा हक्कभंग प्रस्ताव स्वीकारा – सुनील तटकरे; राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कुरबूर

Sunil Tatkare - Yogesh Kadam
  • सुनील तटकरे यांचे वक्तव्य असल्याने बदल शक्य नाही

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी माझ्या विरुद्ध दिलेला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना करणार आहेत.

मी प्रतिनिधित्व करत असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात, मला निमंत्रित न करता खासदार तटकरे कार्यक्रम घेतात, अशी आमदार कदम यांची तक्रार आहे. या मुद्यावर खासदार तटकरे यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

या घटनेवरून लक्षात येते की महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी सोबत असले तरी हे पक्ष आणि त्यांचे नेते आपआपले गड शाबूत राखण्यासाठी आक्रमक आहे.

या अभूतपूर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना खासदार तटकरे म्हणाले की, मी जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच वेळा आमदार व आता संसद सदस्य अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केले आहे. मात्र माझ्यामुळे राज्यातील सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमजाचा संदेश जाता कामा नये. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष पटोले यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा, अशी विनंती मी करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये मला संसद सदस्य म्हणून बैठक बोलावण्याचा अधिकार आहे की नाही, ते त्यांनी तपासून पाहावे. या प्रस्तावावर अध्यक्षांनी मला नोटीस बजवावी. मी त्याला उत्तर देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. म्हणूनच हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेऊन माझ्यावर काही कारवाई करायची असेल तर करा. महाराष्ट्रात सरकार पाच वर्षे टिकवायचे आहे. हे महान देशभक्त दुर्देवाने त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत आहेत. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असाही टोमणा तटकरे यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER