वाईएमसीए (अंडर -१६) आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

football turnament ymca

नागपूर : शारीरिक क्षमता आणि तंदुरुस्ती तसेच मानसिक वाढीसाठी शालेय स्तरावरील युवा प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे यासाठी वायएमसीएतर्फे गेल्या २७ वर्षांपासून (अंडर-१६) आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षीदेखील वाईएमसीएतर्फे ११ ते २० सप्टेंबर दरम्यान (अंडर-१६) आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर शहर व लगतच्या ६० शाळांनी या नॉक-आउट बेस स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

उद्घाटन सामना उद्या बुधवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूर विद्यापीठ मैदान, रविनगर चौक येथे खेळला जाईल. सादर सामना बी.व्ही.एम. सिव्हिल लाइन्स आणि गुरु गोबिंद एज्युकेशन सोसायटी यांच्यात खेळला जाईल.

वायएमसीए अध्यक्ष रोहित मॅकवान यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.