‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोतच आणि पुन्हा उतरु’ – फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’ , असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

“होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, (“Yes, we’ve been on the road for the last year and let’s get back down” ) रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री ‘मातोश्री’ किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरुनच अधिकाऱ्यांना सूचना आणि आदेश देत होते. त्यावेळीही विरोधक मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत होते. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना (CM Thackeray) टोला लगावला.

फडणवीसांची पूर्ण पोस्ट…

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…डेन्मार्कमध्येही तीच

परिस्थिती…पण, एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…पण, २,२०,००० उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केला, पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलं. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे. पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत, पण, ७.४ बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलं. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत, पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलं. युके,जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलं. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!

विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत, आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : …तर दोन तीन दिवसात कडक निर्णय घ्यावा लागेल, मुख्यमंत्रांकडून लॉकडाऊनचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button