हो, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली, आता पत आणि प्रतिष्ठा परत आणू – हेमंत नगराळे

Hemant Nagrale

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांची पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर लगेच नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आताच मी चार्ज घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून चार्ज घेतला आहे. सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहे, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.

ही समस्या आपण सगळ्यांच्या मदतीने, पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. येणाऱ्या दिवसात जी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला चांगलं करण्याचा आणि आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी सांगितलं. तो निश्चितपणे मला मिळेल हा विश्वास आहे. आपण सर्वांनी या कार्यात सहकार्य करावं, जेणेकरुन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं नाव चांगलं होईल. कोणतीही टीका मुंबई पोलिसांवर होणार नाही, अशी परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने, चांगलं सक्षम पोलीस दल म्हणून काम करु, अशी मी ग्वाही देतो, असंही ते म्हणाले.

मागील काही दिवसापासून आपण जे काही बघताय, ज्यापद्धतीने अधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्याचा तपास योग्य पद्धतीने रीतसर तपास एनआयए किंवा एटीएसकडून करण्यात येत आहे. तो तपास योग्य रितीने होईल, याची खात्री आहे. जे कोणी दोषी, सहभागी असेल, त्या सर्वांवर कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER