होय, शरद पवारच ‘जाणता राजा’ – सुशीलकुमार शिंदे

मुंबई :- ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंना चांगलेच फैलावर घेतले होते. शरद पवार यांना हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास आहे. त्यांची करंगळी पकडून अनेक जण राजकारणात आले. ‘होय शरद पवार हे जाणता राजाच’ अशा शब्दांत त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर तोफ डागली होती.

ही बातमी पण वाचा : होय, शरद पवार हे जाणता राजा आहेत ; उद्यनराजेंवर आव्हाडांचा पलटवार

आता या वादात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही होय,शरद पवार जाणते राजेच आहेत असं म्हणत आव्हाडांच्या सुरात सूर मिळवला आहे. दरम्यान, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. जाणता राजा हे केवळ शिवाजी महाराजच होते. अन्य कुणीही नाही. असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला होता.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांना ‘जाणता राजा’ ही तर जनतेने दिलेली पदवी!