‘हो, माझा ‘गॉडफादर’ दिल्लीत आहे !’ दानवेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

Raosaheb Danve & Uddhav Thackeray

औरंगाबाद : राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत आहे.’ असे उत्तर भाजपाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. ‘तुम्ही चोरून लग्न केलं आणि संसार चालवायला बापाकडे पैसे मागता’ असे रावसाहेब दानवे म्हणाले होते.

यावरून हा बापाचा वाद निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्राने मदत करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते. यावर, शिवसेनेने भाजपासोबत युती करून विधानसभेची निवडणूक लढवली आणि युती मोडून राष्ट्रवादी – काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, याचा संदर्भ घेऊन रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोमणा मारला होता – तुम्ही चोरून लग्न केलं  आणि संसार चालवायला बापाकडे पैसे मागता.

यावरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे दानवेंवर टीका करताना म्हणाले होते, दानवेंचा भाडोत्री बाप दिल्लीत असेल, माझा बाप अस्सल आहे. या संदर्भात दानवे म्हणाले – हे मोदींकडे पैसे मागतात. मी इतकंच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता.

आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचं  सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे. त्यांनी माझं  नाव दसरा मेळाव्यात घेततं. हे आधी दाऊद, हाजी मस्तान यांचा बाप काढायचे.  आता माझा बाप काढला. राजकारणात फादर आणि गॉड फादर लागतो. माझा गॉडफादर दिल्लीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER