‘हा’ तर ठाकरे सरकारचा कोव्हीड भ्रष्टाचार ; किरीट सोमय्यांची टीका

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चाललटसर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या किंमतींना रेमडेसिवीर विकत घेण्याची ऑर्डर काढली आहे. मात्र, रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किंमत आणि सुरु असलेला भ्रष्टाचाराप्रकरणी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) येथे याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याला ठाकरे सरकारचा (Thackeray Goverment) कोव्हीड (Covid) भ्रष्टाचार म्हंटले आहे .

सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एप्रिल २०२१ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेमडेसिवीर इंजेक्शन १५६८ रुपयांना खरेदी करण्याची ऑर्डर काढली, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने १३११ रुपये, हाफकिन इन्स्टिट्यूटने ६६५.८४ रुपये तर मीराभाईंदर महानगर पालिकेने ६६५.८४ रुपयांना विकत घेण्याची ऑर्डर काढली. मग या खरेदीच्या किंमतीत इतकी तफावत असल्याने यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत याचिका लोकायुक्त आणि एसीबीकडे दाखल केली असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button