रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव आणला होता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली

Rashmi Shukla - Rajendra Patil-Yadravkar - Maharastra Today

मुंबई :- फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत . राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर दबाव आणल्याची कबुली दिली आहे.

मी ही गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कानावर घातली होती. त्या काळामध्ये मी भाजपसोबत यावे, यासाठी शुक्ला मला भेटल्या होत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही, असे मी शुक्ला यांना सांगितले. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या रडारवर असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या बचावासाठी आता भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER