कंगना पुन्हा चिडली : हां मैं मराठा हूँ, उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?

Kangana Raut

मुंबई :  मुंबई पोलिसांबद्दल अविश्वास. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं यामुळे महाराष्ट्रात सर्व स्तरांतून कंगनाचा विरोध होत आहे. कंगना विरुद्ध शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र सरकार असं ट्विट युद्ध सुरूच आहे. त्यातच कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईबद्दलच्या ट्विट विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले.

त्यानंतर कंगना पुन्हा भडकली आहे. कोणाच्या बापाचा नाही महाराष्ट्र. महाराष्ट्र (Maharashtra) त्यांचा आहे ज्यांनी मराठीचा गौरव प्रतिष्ठित केला आणि हो मी मराठा (Maratha) आहे, काय करायचं ते करा, अशा शब्दांत कंगनाने विरोधकांना सुनावले आहे.

तसेच, “सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय… मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं… “, असंही ट्विट कंगनाने केले आहे.

तसेच, “सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात माझं मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय… मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं…” असेही ट्विट कंगनाने केले आहे. एवढ्यावरच कंगना थांबली नाही तर, इंडस्ट्रीतील लोकांची औकातदेखील तिने काढली आहे. यांची औकात नाही इंडस्ट्रीच्या शंभर वर्षांत एक तरी सिनेमा मराठीचा अभिमान सांगणारा प्रोड्यूस करायची. मी स्वतः इस्लाम डॉमिनेट इंडस्ट्रीत आपला जीव आणि करिअरची बाजी लावली. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईसारखे सिनेमे केलेत. आज महाराष्ट्राच्या या ठेकेदारांना विचारा केले काय यांनी महाराष्ट्रासाठी- अशा शब्दांत कंगना विरोधकंवर भडकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER