होय! सरकार तीनचाकीच आहे; पण चालत आहे- उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार हे तीनचाकी सरकार असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या टीकेला उत्तर देतना म्हटले आहे की, मला दुचाकी चालवण्याची सवय नाही; पण सध्या मी, तीनचाकी कार नाही, पण सरकार चालतो आहे. ३१ व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यावर तीनचाकी सरकार असल्याची टीका होत आहे.

तीनचाकी तर तीनचाकी, मात्र आमचे सरकार चालत आहे ना, हे महत्वाचे आहे. दोन चाके असो किंवा तीन चाके असो. चार चाके असूनही जे आपटायचे ते आपटले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जो चालवणारा असतो त्याच्या हातातील चाक महत्त्वाचे असते. तेच नियंत्रण करत असते.

त्या चाकावर गाडी चालत असते. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असल्याची टीका महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केली होती. इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाकं असणारं वाहन धावतं, पण तीनचाकी ऑटोरिक्षाप्रमाणे असणाऱ्या या सरकारची चाके तीन दिशेला धावली तर काय होईल? असा टोला त्यांनी लगावला होता.