राज्यात उद्यापासून ३ दिवस पावसाची शक्यता, १५ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’

rain

मुंबई : राज्याच्या काही भागात १६ ते १८ फेब्रुवारी पाऊस पडेल. हवामान खात्याने १५ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही थंडी कायम आहे. पश्चिम भागातील हवामानामुळे देशात बर्‍याच भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचीदेखील शक्यता आहे. १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार १६ फेब्रुवारीपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी धान्य झाकून ठेवावे, असा सल्ला दिला हवामान खात्याने दिला. राज्यातील बर्‍याच भागात वादळासह विजांचाही धोका आहे.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यातील हिंगोली, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, अकोला, अमरावती. बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ फेब्रुवारीला हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस आणि वादळाची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

१७ आणि १८ फेब्रुवारीला परभणी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात १८ फेब्रुवारीला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यादरम्यान राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER