यशवंतराव गडाख यांच्या वहिनी घरात मृतावस्थेत आढळल्या

Gauri-Gadakh

अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांची पत्नी गौरी गडाख (Gauri Gadakh) यांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

गौरी या अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अद्याप मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही.

गौरी गडाख यांचा दुपारीच मृत्यू झाला होता, मात्र सायंकाळी उशिरा ही माहिती सार्वजनिक झाली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. गौरी गडाख यांना सायंकाळच्यावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे, असी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER