YRF ने चित्रपटांच्या प्रदर्शनाची केली तारीख जाहीर जर्सीला क्लॅश होईल पृथ्वीराज, चाहत्यांना ‘पठाण’ साठी करावी लागेल प्रतीक्षा

प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने (Production house Yashraj Films) आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारचा (Akshay Kumar) पृथ्वीराज ते रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ या चित्रपटाचा समावेश आहे. यशराजच्या यादीत शाहरुख खानच्या फिल्म पठाणच्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर रिलीजच्या तारखेनुसार शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाला क्लॅश होईल ‘पृथ्वीराज चौहान’. ५ नोव्हेंबरला दोन्ही चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

संदीप और पिंकी फरार
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा संदीप और पिंकी फरार चित्रपट यावर्षी १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, पण कोरोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे.

बंटी और बबली 2
यशराज फिल्म्सच्या बॅनरची बंटी और बबली 2 २३ एप्रिल २०२१ रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण वी शर्मा यांनी केले आहे.

शमशेरा
दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. स्वातंत्र्यासाठी डाकूंच्या एका गटाने इंग्रजांना कसा लढा दिला हे या चित्रपटात दाखवले जाईल.

जयेशभाई जोरदार
रणवीर सिंगचा चित्रपट जयेशभाई जोरदार २७ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह सारखे स्टार्स आहेत. अर्जुन रेड्डी फेम अभिनेत्री शालिनी पांडे जयेशभाई जोरदार या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

पृथ्वीराज
अक्षय कुमारचा पिरेड-ड्रामा चित्रपट ‘पृथ्वीराज’ दिवाळीनिमित्त ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

यशराजच्या चित्रपटांच्या या यादीमध्ये शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ रिलीज होण्याचा उल्लेख नाही. हा चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित होईल असा विश्वास होता, पण आता शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER