कामाचे १८०० रुपये मागणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

Yashomati Thakur

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (video viral) झाला आहे. यात ती काही तरुणांना तिच्या कामाचे १८०० रुपये मागत आहे. ते तरुण तिला १८०० रुपये दिला असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार दिसत नाही. सदर तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोट आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे.

ती म्हणते की तुम्ही मला ५०० च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे अठराशे रुपये हवे आहे. यावरून ते तरुण मोठ्या विचारात पडल्याचे दिसून येत आहेत.

हा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, त्याचीदखल राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. राज्यात अश्या महिलांसाठी राज्यात मोठ्याप्रमाणात आर्थिक साक्षरता अभियान राबवणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत. अशी घोषणा ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER