नवनीत राणा म्हणजे ‘जिधर बम, उधर हम’, यशोमती ठाकूर यांची टीका

Yashomati Thakur criticise Navneet Rana.jpg

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यात शाब्दिक चकमक चांगलीच वाढली आहे. नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करत महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली होती. यावर महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवनीत राणा यांचा स्वभावच आधीपासूनच ‘जिधर बम, उधर हम’ असा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठाकूर म्हणाल्या की, खासदार नवनीत राणा यांचं काम शून्य आहे. मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा खटोटोप करत असतात. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा ह्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवश्यावर निवडून आल्या. मात्र निवडून आल्यावर त्यांनी लगेच रंग बदलला. त्यांचा स्वभावच आधीपासूनच ‘जिधर बम, उधर हम’ असा आहे. आणि विशेष म्हणजे नौटंकी जिथे करायची तिथेच खासदार नवनीत राणा असतात, असं ठाकूर म्हणाल्या.

विशेष म्हणजे कोरोनाच्या संकट काळात त्यांनी अमरावती जिल्ह्यात काहीच काम नाही. यशोमती ठाकूर म्हणाल्या कि, जर कोणाला कामच दिसत नसेल पण सोंग घेतलं असेल तर काम कसं दिसणार, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER