‘या’ राशी असतात ‘मेड फाॅर इच अदर’…..

राशी

आपण कितीही आधुनिक झालो असलो तरी आजही आपल्या भारतामध्ये लग्नाआधी मुला-मुलीचे पत्रिका बघूनच लग्न जोडले जातात. असं सांगितलं जातं की, ज्योतिष शास्त्रातील १२ राशींचा वैवाहिक जीवनावर बराच परिणाम होत असतो. प्रत्येकाच्या राशीनुसार त्याचा विशेष स्वभाव असतो. आणि त्या स्वभावाला योग्य स्वभावाचा किंवा राशीचा जोडीदार मिळाला तर त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुमंगल होतं. जर तुमच्या पार्टनरची राशी तुमच्या राशीसोबत जुळत असेल तर लव्ह लाईफ चांगली राहते, असेही बोलले जाते. म्हणून दोन व्यक्तींचा संसार सुखाचा होण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या राशी देखील अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. तर मघ बघा..कोणत्या दोन राशी आहेत ज्या एकमेकांसाठी बेस्ट आहेत…

  • made for each otherमिथुन-तुळ :- या राशींचे कपल एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल राहतात. मग ते फिजिकली असो वा मेंटली. या राशीच्या लोकांचा संसार अधिक सुखाचा होतो, असे बोलले जाते.

  • सिंह-तुळ :- या दोन्ही राशीच्या लोकांना सोशली कनेक्ट राहायला आवडतं. त्यामुळे सोशल मीडिया हे यांच्यातील वादाचं कारण कधीच राहू शकत नाही. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये कायम सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहण्याची कायम इच्छा असते. त्यामुळे दोघांच्याही घरात या व्यक्ती लोकप्रिय असतात.

  • मेष-कुंभ :- या दोन्ही राशीच्या लोकांना अॅडव्हेंचर करणं अतिशय आवडतं. त्यामुळे मेष आणि कुंभ राशीचे ट्रेकर्स एकत्र येण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे हे नेहमी एकमेकांसोबत राहणे पसंत करतात. आणि त्यामुळेच हे दोघे निसर्ग अधिकच एन्जॉय करतात.

ही बातमी पण वाचा : या ‘४’ अक्षरांनी सुरु होत असेल तुमच्या गर्लफ्रेंडचे नाव ..तर मघ बघा त्यांचा स्वभाव

  • वृषभ आणि वृष्चिक :- वृषभ आणि वृष्चिक या दोन्ही राशींमध्ये लीडरशिप संदर्भात कोणतेही मतभेद होत नाहीत. हे दोघे एकमेकांच्या निर्णयाचा सन्मान करतात. आणि हीच या दोन राशीची जमेची बाजू आहे.

  • वृषभ-कन्या :- या दोन्ही राशीच्या लोकांसाठी घर, कुटुंब आणि स्थिरता महत्वाची असते. यामुळे यांच्यामध्ये जबरदस्त अंडरस्टॅण्डिंग राहते. एकमेकांना समजून घेण्याची पूर्ण तयारी असल्यामुळे हे लोक कायम एकत्रच राहतात.

  • धनु-सिंह :- धनु राशीच्या लोकांना सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूप आवडतो आणि दोघेही एकमेकांना वेळोवेळी सपोर्ट करतात. त्यांचा आत्मविश्वासच त्यांच्या प्रेमाला अधिक खुलवत असतो. कन्या आणि मकर हे लोक एकमेकांसाठी प्रामाणिक असतात. कधीही खोटं बोलत नाही. आणि हेच याची जमेची बाजू आहे. आणि हिच गोष्ट रिलेशनशिप नेहमी मजबूत राहते.

  • मिथुन-कुंभ :- मिथुन आणि कुंभ या दोन्ही राशींमध्ये एकमेकांकडे खूप आकर्षित होतात. आणि आयुष्यातील चढ-उतारांचा एकरूप होऊन सामना करतात. कुंभ आणि सिंह या दोन्ही राशीच्या लोकांचे नाते उत्साहाने भरलेले राहते. जोडीदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाहीत.

ही बातमी पण वाचा : जर ‘ही’ असेल तुमची रास…तर बनाल बेस्ट हसबॅंड…