मंत्री उदय सामंत यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

Uday Samant

मुंबई : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना धमक्या मिळत असल्याने ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत गृह मंत्रालयाने राज्य गुप्तवार्ता विभाग तसेच पोलीस महासंचालकांना कळवले आहे.

उदय सामंत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेकडून धमकीचा फोन आला होता. गेल्या आठवड्यात ते अमरावती विद्यापीठ दौऱ्यावर होते. दौरा आटोपून नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याच वेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती.

नागपूरला पोहचू देणार नाही

उदय सामंत अमरावती विद्यापीठात परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान काही विद्यार्थी संघटनांनी – तुम्हाला नागपूरला पोहचू देणार नाही, अशी फोनवरून धमकी दिली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. मी अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. ज्या विद्यार्थी संघटनांना चर्चा करायचे असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणार आहे, असे उदय सामंत म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER