शाओमीने आणला अत्याधुनिक ‘के ३०’

२० हजार रुपयांचा महागडा स्मार्ट व फिचर फोन

Xiaomi introduces the latest 'K30'

मुंबई :- चीनी शाओमी कंपनीने अल्पावधीतच अत्याधुनिक मोबाइल आणून भारतीय बाजारात चांगलेच प्रस्थान बसवले आहे. बाजाराकडून चांगला प्रतिसाद येत असल्याचे पाहून कंपनीने आता आणखी अत्याधुनिक मोबाइल हॅण्डसेट आणला आहे.

शाओमीचा रेडमी के२० च्या यशानंतर कंपनीने रेडमी के३० लाँच केला आहे. Redmi K30 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. शाओमीने या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनची किंमत सर्वांना परवडेल अशी ठेवली आहे.

५ जी कनेक्टिव्हिटी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १९९९ युआन म्हणजेच जवळपास २० हजार रुपये इतकी ठेवली आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी लाँच करणार याविषयी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. रेडमी के ३० मध्ये मिळालेल्या अपग्रेड्सचा विचार केला तर यात रिफ्रेशचा डिस्प्ले, जास्त पॉवरफुल चिपसेट आणि जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी के३० चे चार ५जी प्रकार आहे. ज्यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १,९९९ युआन म्हणजे २० हजार रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत २,२९९ युआन म्हणजेच २३ हजार रुपये इतकी आहे. याचा हाय अँड व्हेरियंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत २,५९९ युआन म्हणजेच २६ हजार रुपये आणि ८ जीबी रॅम तसेच २५६ जीबी स्टोरेजची किंमत २,८९९ युआन म्हणजेच २९ हजार २०० रुपये आहे. रेडमी के ३० च्या फोरजी कनेक्टिव्हिटीच्या फोनची किंमत ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत १,५९९ युआन म्हणजेच १६ हजार रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १,६९९ युआन म्हणजेच १७ हजार रुपये आहे. तर ८ जीबी रॅम सह १२८ जीबीच्या फोनची किंमत १,८९९ युआन म्हणजेच १९ हजार रुपये आहे.

रेडमीच्या फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा सोनी आयएमक्स ६८६ प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे.