भारतीय लष्कराच्या प्रतिकारामुळे जिनपिंग यांची चाल फ्लॉप – अमेरिकन मीडिया

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष (President of China) शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या खेळीमुळे चीनच्या लष्कराने भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला पण भारताच्या लष्कराच्या आक्रमक प्रतिकारामुळे तो अयशस्वी झाला. यामुळे जिनपिंग यांच्या भवितव्याबाबत धोका निर्माण झाला आहे, असे अमेरिकेच्या ‘न्यूजवीक’ या नियतकालिकाने ‘ ओपिनियन पीस’मध्ये म्हटले आहे.

गलवानमध्येच चीनचे ६० सैनिक ठार

या अपयशामुळे जिनपिंग यांना अधिकाऱ्यांना बदलण्याचे कारण मिळाले आहे. सैन्य दलात त्यांच्याशी निष्ठावान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची संधी मिळाली आहे. लद्दाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चिनी सैनिकांच्या संघर्षात चीनचे ४०-४५ नव्हे ६० सैनिक ठार झाले होते, असे ‘न्यूजवीक’ने म्हटले आहे. सततच्या या अपयशामुळे चीन पुन्हा भारतावर आक्रमक चाल करुन येऊ शकतो, असा इशारा ‘न्यूजवीक’ने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER