दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलाव्यात; आशिष शेलार यांची मागणी

Ashish Shelar - X-XII Examination

मुंबई : वाढत्या रुग्णांची आकडेवारी पाहता दहावी-बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, असे भाजपा (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. कोरोनाने राज्यभरात थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.

आशिष शेलार यांनी सांगितले की, कोविडची सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल.” असेही आशिष शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button