‘लिहून द्या रोहिंग्यांना काढा; मग पाहा काय करतो!’ शहांचे ओवेसींना आव्हान

Amit Shah-Owaisi

हैदराबाद :- ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना प्रश्न विचारला होता – हैदराबादमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे वास्तव्य असेल  तर अमित शहा  कारवाई का करत नाहीत? याला अमित शहा यांनी उत्तर दिले, ओवेसी, लिहून द्या की बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका. मग पाहा मी काय करतो!

सध्या हैदराबादमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अमित शहा यांनी आज रोड शो केला. रोहिंग्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले – रोहिंग्यांवर आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा विरोधी पक्ष गोंधळ घालतात. ओवेसींनी एकदा आम्हाला लिहून द्यावे की बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका. मग पाहा मी काय करतो.

आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करण्यासाठी आणि मिनी इंडिया बनवणार आहोत. आम्हाला हैदराबादला एक आधुनिक शहर बनवायचं आहे. जे शहर निजामाच्या संस्कृतीतून मुक्त असेल, असे शहा म्हणाले.

भाजपाला समर्थन देण्यासाठी मी हैदराबादच्या लोकांचे आभार मानतो. यावेळी भाजपा आपल्या जागा वाढवण्यासाठी किंवा  आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी लढतो आहोत. यावेळी हैदराबादचा महापौर आमच्याच पक्षाचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमित शहा  यांनी आज रोड शो केला. त्याआधी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली. रोड शोनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी  निवडणुकांमध्ये भाजपा बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपाचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नवा मार्ग मिळाला – पंतप्रधान मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER