नीट आणि जेईईच्या विध्यार्थ्यांना लोकलच्या प्रवासाच्या परवानगीसाठी रेल्वेला पत्र लिहा – आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Ashish Shelar & Uddhav Thackeray

मुंबई : उद्यापासून महाराष्ट्रात नीट आणि जेईईच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षांना राज्यातील सुमारे २. २ लाख विध्यार्थी बसत आहेत. मुंबईत परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी या विध्यार्थ्यांना हॉल तिकिटावर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहावे, अशी विनंती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे आहे.

कोरोनाच्या साथीमुळे मुंबईची लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे. नीट आणि जेईईच्या विध्यार्थ्यांना जर लोकलमध्ये प्रवासाची परवानगी मिळाली तर या विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचणे सुकर होणार आहे. याचा फायदा ५० हजारपेक्षा जास्त विध्यार्थ्यांना होणार आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहिले. उत्तरात गोयल यांनी शेलार यांना कळवले की, या विध्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करू देण्यास रेल्वेला काही अडचण नाही पण हा प्रस्ताव राज्य शासनाकडून आला पाहिजे. म्हणून शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये शेलार यांनी लिहिले आहे – नीट आणि जेईईच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हॉल तिकटवर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही मा. रेल्वे मंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER