कोल्हापुरात कुस्ती सरावाचा प्रारंभ

कोल्हापूर : देशभरात लॉकडाऊनमुळे गेली आठ महिने बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले झाले.  कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची मोतीबाग तालीम सुरू झाली.

आज शनिवार पहाटे ६ वाजता हनुमानाच्या मूर्तीला फुले वाहून  आखाडा पूजन केले.  पहिलवानांनी जोर-बैठकाची मेहनत करत कुस्तीचा सराव केला. शासन नियमावलीचे पालन करून सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात  सराव घेतला जाणार आहे. या शुभारंभास तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पोवार, निलेश देसाई, अशोक माने, वस्ताद, उत्तम चव्हाण, रामा कोवाड, विजय पाटील, बाबुराव चव्हाण, वस्ताद दादू चौगुले, जुनिअर कुस्ती कोच सुहेल इत्यादी प्रमुख कुस्तीगीर  उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER