दोस्तीत कुस्ती बरी नाही, बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची चाहूल; धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया

Dhairyasheel Mane

मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आणि निवडणुकीनंतर झालेली परिस्थिती यामुळे सर्वात मित्रपक्ष असलेली शिवसेना भाजपपासून दूर झाली. आता बिहारमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होते की काय, अशी शंका शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी व्यक्त केली.

बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections) प्रचारदरम्यान नितीश कुमार (Nitish Kumar) हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असं भाजपकडून (BJP) स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ बनला आहे. त्यामुळे आता भाजपकडून नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार का? असा प्रश्नही माने यांनी उपस्थित केला आहे .

‘दोस्तीत कुस्ती बरी नाही’ या म्हणीचा वापर करत राजकारणात जागा कमी किंवा जास्त झाल्या म्हणून शब्द न पाळणं, हे बरोबर नसल्याचं सांगत माने यांनी भाजपला टोला लगावलाय. बिहारमध्ये चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी नितीश कुमारांसमोर स्वत:ची माणसं उभी केली. त्यामुळे नितीश कुमार यांना नुकसान झालं. हे कुणापासून लपलेले नाही, अशी टीकाही माने यांनी भाजपवर केली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मिळून काम करत आहे. विरोधी बाकांवर असलेल्या भाजपने जे काही करावं ते महाराष्ट्राचा विचार करुन करावे . कारण शेवटी राज्याचे हित महत्वाचे , असा सल्लाही धैर्यशील माने यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER