पैलवान सुशील कुमारला अखेर अटक; दिल्ली पोलिसांनी पंजाबमधून घेतले ताब्यात

Sushil Kumar - Arrested - MAharashtra Today

नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमारला अखेर अटक करण्यात आली आहे. तसं वृत्त राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रांनी दिलं आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला पंजाबमध्ये ताब्यात

घेतल्याची माहिती मिळतेय. सुशील कुमारसह त्याचा खासगी सचिव अजय कुमार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या अटकेसाठी पंजाब आणि हरियाणात छापे टाकले होते.

सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी इनामही जाहीर केलं होतं. सुशील कुमारच्या नावावर १ लाख तर अजय कुमारवर ५० हजाराचं इनाम ठेवण्यात आलं होतं. सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर मानसिक दबावाखाली येतील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याच वेळी, अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. पण सुशील कुमारचा जामीन अर्ज रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी पहाटे १.१५ ते १.३० या वेळेत छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग परिसरात मल्लांच्या दोन गटात कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे रूपांतर मारहाणीत होताच फायरिंग झाले. त्यात पाच मल्ल जखमी झाले होते. यात सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचे वडील दिल्ली पोलिसांत हेडकॉन्स्टेबल आहेत. सागर आणि त्याचे मित्र ज्या फ्लॅटवर राहायचे तो फ्लॅट खाली करण्यासाठी सुशील दबाव आणत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button