स्टेडियममध्ये हाणामारीत पहिलवानाचा मृत्यू, सुशीलकुमार म्हणतो आमचा संबंध नाही

Wrestler killed in fight in stadium-Sushilkumar under scanner

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर सुशीलकुमार (Wrestler Sushilkumar). हा छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal stadium) पहिलवानांच्या भांडणात एका पहिलवनाचा मृत्यू आणि त्याचे दोन मित्र जखमी झाल्याच्या प्रकरणात अडचणीत आला आहे. ही घटना घडली त्यावेळी सुशीलकुमार तिथे उपस्थित होता असे समोर आले असून या प्रकरणी दाखल खूनाच्या गुन्ह्यात सुशीलकुमारचेही नाव घेण्यात आले आहे.

यासंदर्भात सुशीलकुमारने म्हटलेय की, ते आमचे पहिलवान नव्हते. ही घटना रात्री उशिरा घडली आहे. आम्हीच पोलिसांना कळवले होते की काही अनोळखी व्यक्ती आमच्या जागेत येऊन भांडण करत आहेत. आमचा वा आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काहीही संबंध नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिल्लीतील छत्रसाल क्रीडा संकुलात काही पहिलवानांनी हा 23 वर्षीय पहिलवान व त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाण केली. त्यात सागर नावाच्या त्या युवा पहिलवानाचा मृत्यू झाला तर त्याचे मित्र जखमी झाले. मंगळवार आणि बुधवारदरम्यानच्या रात्री छत्रसाल स्टेडियममध्ये गोळीबार झाल्याची माहिती मॉडेल टाउन पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता स्टेडियममध्ये पाच कार लावलेल्या आढळून आल्या.

चौकशी केली असता कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमीत आणि इतरांमध्ये भांडण झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शस्रास्र कायदा व इतर कलमांन्वये मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. त्यात खूनाचेही कलम लावण्यात आले आहे.

या भांडणात सागर, अमीतकुमार व सोनू हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. घटनास्थळी पोलिसांना पाच जीवंत काडतुसांसह एक बंदूक आणि दोन लाकडी काठ्या मिळून आल्या. तेथील पाचही कार आणि शस्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच झझ्झर येथील प्रिन्स दलाल याला एका बंदुकीसह अटक करण्यात आली आहे.

मॉडेल टाऊन परिसरातील मालमत्तेच्या वादावरुन ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आरोपी हे मयत व जखमींना जबरदस्तीने स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिथे पार्किंगमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली. य घटनेवेळी सुशीलकुमार तिथे होता पण त्याची या प्रकरणात काय भुमिका होती याची चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button