
वॉशिंग्टन : अमेरिकेत सहसा कोणत्याही प्रकारचे फ्रॉड वोटर्स आढळून येत नाहीत याची पुष्टी निवडणूक तज्ञांनी केल्याचे वृत्त अमेरिकेतील डिट्रॉईस फ्री प्रेसने दिले आहे. हे वृत्त ट्वीट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्वा हा अहवाल तर फसवणूक दर्शवतो, म्हणजे निवडणुका निकाल बदलतात असा टोमणा मारला आहे.
जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर निवडणूक तज्ञांनी फ्रॉड मतदारांसदर्भात एक अहवाल सादर केला त्यामध्ये अमेरिकेत फ्रॉड मतदार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्ताचा आधार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी हा अहवाल फसवणूक दर्शवतो असे म्हणत, निवडणुका निकाल बदलतात असे ट्वीट करून म्हटले आहे.
WOW. This report shows massive fraud. Election changing result! https://t.co/dFT3sRpUY5
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 14, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला