व्वा! मुंबईकर पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठीच कर भरतात! ; नितेश राणेंची टीका

Nitesh Rane & BMC

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारवर टीका केली आहे.

पेंग्विन आणि कंगना रणौतच्या प्रकरणातील वकीलासाठी मुंबईकर कर भरतात. आणखी काय शिल्लक आहे? आता असं वाटतंय की यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील,” असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते.

कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले जात असताना कंगणाच्या वकिलाने आपण उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे निदर्शनास आणल्यावर तोडकाम थांबण्यात आले होते. कंगणाच्या बेकायदेशीर काम तोडण्यास उच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने कोणत्या वकिलाची नियुक्ती केली आणि त्यांना किती रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांनी मागितली होती.

याबाबत माहिती देताना या प्रकरणी पालिकेची उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पि चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबर 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केले आहेत अशी माहिती पालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER