36 हजार एकर जमीन असलेले खा. उदयनराजे भोसले 2 लाखांची खंडणी मागतील का? : जितेंद्र आव्हाड

awhad

सातारा/मुंबई: साताऱ्यात 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला आहे. 36 हजार एकर जमीन असणारे खासदार उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयन राजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.