प्रकाश आंबेडकरांसोबत काम करण्यास नक्कीच आवडेल – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Prakash Ambedkar

पुणे :- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल, पण ते नेहमीच आमच्यापासून दूर राहिले आहेत. सामाजिकदृष्ट्या आम्ही एकत्र काम केलं पाहिजे, असं सूचक विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ कधीच असू शकत नाही. कारण प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच भाजपवर टीका केलेली आहे. असा दावा पाटील यांनी केला. स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर यासंदर्भात चर्चा सुरु आहे. ते कोणाबरोबर कम्फर्टेबल आहेत, यावरुन निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले.

अकोला जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मात्र आम्हाला अद्याप कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही. सध्या आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. प्रस्तावानंतर आम्ही नक्की विचार करु. प्रस्ताव काय येतो त्यावरुन पुढचा निर्णय घेऊ, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या शपविधीला पावणे तीन कोटी, तर फडणवीसांच्या शपथविधीला ९८ लाखांचा खर्च