अंबाबाई देवीची ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’रुपात पूजा

अंबाबाई देवीची ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’रुपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात रविवारी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’रुपात पूजा बांधली.

यंदाच्या नवरात्र उत्सवात (Navratri Festival) करवीर माहात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून देवीचे दर्शन या संकल्पनेवर रोज वेगवेगळया रुपात पूजा बांधल्या जाणार आहेत. रविवारी बांधलेल्या पूजा मध्ये करवीरनिवासिनी ही पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन देताना विराजमान झालेली आहे.

याची पार्श्वभूमी अशी, श्री महालक्ष्मी देवी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन देते तेव्हा त्यांचा सर्व संशय, भेदभाव फिटतो व ते देवीला विष्णुस्वरुपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात. सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने स्तुती करतात. ही पूजा माधव मुनिश्वर व मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER