चिंताजनक : देशावरील कर्जाचा डोंगर वाढतोय; जून २०२० पर्यंत १०१.३ लाख कोटी रुपये

वर्षभरापूर्वी जून 2019 च्या शेवटपर्यंत सरकारचं एकूण कर्ज 88.18 लाख कोटी रुपये इतकं होतं

चिंताजनकः देशावरील कर्जाचा डोंगर वाढतोय; जून 2020 पर्यंत 101.3 लाख कोटी रुपये

नवी दिल्ली :- कोरोनाने (Corona) संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. त्यातच भारतावरचा कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. केंद्र सरकारवरील कर्ज (Government of India Libalities) जून २०२० च्या शेवटपर्यंत वाढून १०१.३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. सार्वजनिक कर्जावर (Debt) जारी नवीनतम रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

ही रक्कम जून २०२० पर्यंतची आहे.

वर्षभरापूर्वी जून २०१९ च्या शेवटपर्यंत सरकारचं एकूण कर्ज ८८.१८ लाख कोटी रुपये इतकं होतं.

कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान झालं आहे. गेले चार महिने सर्व उद्योगधंदे, व्यवहार बंद असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास पाच वर्षांचा कालावधी लागू शकेल अशी माहिती जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट (Carmen Reinhart) यांनी गुरुवारी दिली. स्पेनची राजधानी मॅड्रिड या ठिकाणी झालेल्या परिषदेत रेनहार्ट यांनी हे वक्तव्य केले. तसेच ते म्हणाले की, जवळपास २० वर्षांत ही पहिली वेळ असेल की, गरिबीचे प्रमाण जागतिक स्तरावर वाढेल.

बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry Report) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार जून २०२० च्या शेवटपर्यंत सरकारचं कर्ज वाढून १०१.३ लाख कोटी रुपये झालं आहे. मार्च २०२० पर्यंत हे कर्ज ९४.६ लाख कोटी रुपये होतं, जे कोरोनामुळे सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी जून २०१९ मध्ये हे कर्ज ८८.१८ लाख कोटी रुपये होतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, केंद्र सरकारने चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यादरम्यान ३,४६,००० कोटी रुपये तारखेच्या सिक्युरिटीज जारी केली. मात्र एक वर्षापूर्वी या अवधीत २,२१,००० कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज जारी करण्यात आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER