चिंताजनक : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर! -फडणवीस

Devendra fadnavis

नागपूर :  परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर घसरला हे निश्चितच चिंताजनक आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे व्यक्त केले.

ते म्हणालेत, आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, मागील वर्षभरात थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. यातल्या अनेक प्रकल्पांचे ‘एमओयूज’ आमच्या काळातच झाले आहेत. आता पुन्हा तेच होत आहेत, हरकत नाही; महाराष्ट्रासाठी जे चांगले होते त्याचा आम्हाला आनंदच आहे, असे फडणवीस म्हणालेत.

सगळ्यात चिंतेची बाब ही, मागील चार वर्षांत आपण पहिल्या क्रमांकाचे FDI चे राज्य केले होते. देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती. आता आरबीआयने जी आकडेवारी घोषित केली त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि त्याच्या मागे महाराष्ट्र आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER