जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरट्यावर : संदीप वासलेकर

संदीप वासलेकर

कोल्हापूर : आर्थिक विषमता वाढली की बेरोजगारीतून नैराष्य वाढते, राष्ट्रवादाकडे माणूस झुकतो. याचस्थितीत मुसोलिनी आणि हिटलरसारख्या प्रवृत्तींचा उदय झाला. वसूदेव कुटुंबकम ही संकल्पना सध्या मागे पडून जगात सर्वत्र प्रखर राष्ट्रवाद आणि लष्करीकरण वाढत आहे. यातून जग येत्या दहा वर्षात विध्वंसाच्या दिशेने जाईल, अशी भिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली. ते ’नव्या दिशेचा शोध’ याविषयावर ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते.

वासलेकर म्हणाले, प्रत्येकाच जग वेगळे असते यासंकल्पनेवर आठ अब्ज इतकी जगाची दिशा म्हणावी लागेल. शंभर वर्षापूर्वी युध्द आणि स्वातंत्र ही जगाची दिशा होती. त्यानंतर ती औद्यागिकीकरण झाली. काही वर्षापूर्वी पर्यावरण ही जागाची दिशा होती. मानव जातीच्या १२ हजार वर्षाचा विचार केला तर नवीन असे काहीच नसते जुनेच प्रवाह पुढे येत असतात. तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रवाहात नियमित बदल होत असतात. ते मागील वर्षीपेक्षा आता जास्त आहेत असे वाटत राहते. आरोग्य आणि पर्यावरण जपत विकास साधण्याची गरज आहे.

काेरोनामुळे (Corona) जग बदलणार नाही. उलट आता मागील काही वर्षातील प्रश्नांनी उग्ररुप घेतले आहे. २०२० वर्ष हे थांबलेले आहे. पुढील वर्षी बदल दिसतील. २०२२नंतर याचे परिणाम कमी होतील. कमी गरजांमध्ये भागू शकते ही संकल्पना घेवून काही लोक जगतील. गेल्या दहा हजार वर्षाचा विचार केला तर मानवतेची वाटचाल ही चांगुलपणाच्या दिशेने झाली आहे. सध्या नैराश्याचे पडदे असले तरी त्यापलिकडे चांगुलपणा आहे हे विसरु नका, असा आशवादही वासलेकर यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER