तंबाखू सोडवण्यासाठी घरगुती उपाय

World No Tobacco Day - Home Remedies for Tobacco

मुंबई :- तंबाखू खाणे (Tobacco) आरोग्यासाठी धोकादायक आहे. तंबाखू अनेक स्वरूपात मिळते. गुटखा, सुपारीपासून केमिकलयुक्त सुपारी यात तंबाखू असते.

तंबाखू खाण्याने कॅन्सरचा धोका वाढतो. तोंडाचा कॅन्सर होण्यामागे तंबाखू खाणे हे एक मुख्य कारण आहे. आरोग्याला घातक असे हे व्यसन सोडले पाहिजे. तंबाखूचे व्यसन सोडण्याची इच्छा अनेकांना असते मात्र याची नशेसारखी सवय झाल्याना तंबाखू सोडणे जमत नाही. डॉक्टर अनेकदा त्यासाठी महागडे उपचार सुचवतात. पण, काही घरगुती उपायांनीही तंबाखू सुटते!

घरगुती उपाय

तंबाखू सोडण्यासाठी मुख्य आवश्यक आहे व्यसनाधीन व्यक्तीची तंबाखू सोडण्याची इच्छाशक्ती. इच्छा असेल तर व्यक्ती नक्कीच तंबाखूचे व्यसन सोडू शकतो. यासाठी ओवा, लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा ते खा.

बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणे सोपे जाते. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो, दात खराब होतात, त्यावर काळे डाग पडतात. म्हणून तंबाखूचे व्यसन शक्य तितक्या लवकर सोडावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button