उपांत्य फेरीत भारत कुणाशी खेळणार?

पाकिस्तानचे आव्हान संपल्यात जमा

World Cup 2019

आयसीसी वर्ल्ड कप-२०१९ : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चारही संघ जवळपास निश्चित झाले आहेत. अॉस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंडचे अंतिम चौघातील स्थान निश्चित आहे. न्यूझीलंडची केवळ नाममात्र निश्चिती बाकी आहे.

पाकिस्तानचा डब्बा गुल

पाकिस्तानने ४०० किंवा ३५० धावा रचून बांगलादेशला अनुक्रमे ३१६ किंवा ३११ धावांनी पराभूत केले तरच न्यूझीलंडचे स्थान धोक्यात येईल आणि पाकिस्तान अंतिमचौघात पोहचेल. पण बांगलादेशी संघाचा अलीकडचा प्रभावी खेळ आणि पाकिस्तानचा बेभरवशाचा खेळ बघता असे होणे कठीणच आहे. त्यामुळे विश्वचषक-१९ मधून पाकिस्तानचे आव्हान संपल्यातच जमा आहे. जर बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानला नंतर फलंदाजीची वेळ आली तर सामना सुरू होण्याआधीच ते बाद झालेले असतील. त्यामुळे पाकिस्तानसाठी १९९९ ची पुनरावृत्ती आता संपली आहे.

ही बातमी पण वाचा : टॉस हारला तरी पाकिस्तान होणार विश्वचषकाबाहेर!

उपांत्य सामन्यांच्या काय आहे शक्यता?

या पार्श्वभूमीवर उपांत्य फेरीचे सामने आता कसे होतील याची उत्सुकता आहे. अद्याप भारताचा श्रीलंकेशी आणि अॉस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेशी सामना बाकी आहे.

आता समजा यापैकी अॉस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला आणि भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला तर उपांत्य सामने पुढीलप्रमाणे होतील…

  • 1) भारत वि. न्यूझीलंड
  • 2) अॉस्ट्रेलिया वि. इंग्लंड

भारताला ही स्थिती अनुकूल असेल कारण साखळी सामन्यात आपण इंग्लंडकडून पराभूत झालो होतो. तो मानसिक दबाव साहजिकच संघावर येऊ शकतो.

आता समजा अॉस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आणि भारत श्रीलंकेकडून पराभूत झाला तर

  • 1) अॉस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
  • 2) भारत वि. इंग्लंड

असे उपांत्य सामने होतील.

आणाखी एक शक्यता अशी की अॉस्ट्रेलिया व भारत या दोन्ही संघांनी शेवटचा साखळी सामना जिंकला किंवा दोघांनी गमावला तर

  • १) अॉस्ट्रेलिया वि न्यूझीलंड
  • २) भारत वि इंग्लंड

असेच उपांत्य सामने होतील .