गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी जागतिक बँकेने १२ बिलियन डॉलर्स द्यावे

- अध्यक्षांची संचालक मंडळाकडे मागणी

The World Bank

कोरोनावरची (Corona) लस उपलब्ध झाल्यानंतर ती जगातील विकसनशील देशांना आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी १२ बिलियन डॉलर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केली आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, कोरोनाची लस आल्याबरोबर आरोग्य आणि इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळावी यासाठी जगातले अनेक नेते कोरोनाची लस तयार करण्याला आर्थिक मदत करत आहेत. ब्रिटन, जर्मनीमध्ये तयार होत असलेल्या लसीचे लाखो डोस मिळावे यासाठी अमेरिकेने ३ बिलियन डॉलर लावले आहेत.

गरीब व विकसनशील देशांना ही लस मिळावी यासाठी आर्थिक सोय करण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य बँक करते आहे, असे मालपास म्हणाले. विकसित देशांना कोरोनाची लस लवकर मिळाली नाही तर अनेक देशांची आर्थिक स्थिती ढासळू शकते. लाखो लोक पुन्हा दारिद्याच्या खाईत जाऊ शकतात. लस निर्माण करणाऱ्या कामन्यांना आम्ही सुचवले आहे की, त्यांनी लसीच्या वितरणाचा आराखडा तयार करावा. त्यात विकसनशील देशांसाठी कोटा ठेवावा.

श्रीमंत देशांनी त्यांच्या गरजेशिवायचा लसीचा अतिरिक्त साठा गरीब देशांना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER