जागतिक बँक अहवाल : शाळा बंदचा साडेचारशे अब्ज डॉलरचे नुकसान

नवी दिल्ली : जागतिक बँकेने (World Bank report) बिट ऑर ब्रोकन? इन्फॉर्मेलिटी अँड कोव्हिड-१९ (Covid-19) इन साऊथ एशिया’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आला आहे.

त्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शिक्षण व्यवस्थेवर देखील दूरगामी परिणाम झाले आहेत. शाळा दीर्घकाळ बंद राहिल्याने भारताला याची मोठी आर्थिक आणि सामाजिक किंमत मोजावी लागणार आहे. हा फटका साधारणपणे साडे चारशे अब्ज डॉलरच्या घरात असू शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.

शाळा बंद राहिल्याने दक्षिण आशियातील देशांना ७०० अब्ज डॉलरच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. परिस्थिती आणखीनच चिघळली तर हे नुकसान ९०० अब्ज डॉलरच्या घरामध्ये जाऊ शकते. प्रादेशिक पातळीवर भारताला याचा सर्वाधिक फटका बसणार असून अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये यामुळे मोठी घसरण होईल, असे मत अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

दक्षिण आशिया २०२० मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत वाईट मंदीला सामोरे जाणार असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.

अध्ययनाचा प्रश्न गंभीर सध्या शाळा बंद असल्याने मुलांवर असंख्य बंधने येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही पातळ्यांवर ३८८ दशलक्ष मुले शाळेपासून दुरावली आहेत, यामुळे त्यांच्या अध्ययनाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक देशांनी मुलांना कोरोना काळात शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोचणे शक्य झालेले नाही. कोरोनामुळे ५.५ दशलक्ष मुले ही शिक्षण व्यवस्थेपासून दुरावली असल्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

पाच महिने शाळा बंद राहिल्याने मुले अभ्यास करणे विसरली आहेत. मुलांचे ५ वर्षांपर्यंतचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेकडून लेज पद्धती शैक्षणिक वर्षांची संख्यात्मक वाढ आणि गुणवत्ताविकासावर भर देण्याची गरज आहे. प्रत्येक मूल त्याच्या आयुष्यातील पाच हजार डॉलरचे उत्पन्न गमावेल असे अहवालात नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER