हातात काठी घेऊन काम करा, तरच सत्ता मिळणार; चंद्रकांत पाटलांचा नगरसेवकांना सल्ला

Chandrakant Patil

पुणे : कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे जवळपास दीड वर्ष फुकट गेले आहे. कोरोना महामारीच्या आधी आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. मात्र आता काम करण्यासाठी फक्त सहा महिनेच मिळणार आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असा सल्ला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नगरसेवकांना दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना उद्देशून हे विधान केले. आता आपल्या हातात केवळ सहा महिने आहे. या सहा महिन्यात जिद्दीने काम करा, खुर्ची टाकून बसा. गटर, पाणी, ड्रेनेज यात अडकून पडू नका. मुंबईनंतर पुण्यात चांगलं काम करा. हातात काठी घेऊन काम करा. सहा महिन्यात खूप काही करता येते. या संधीच सोन करा, चांगलं काम केलं तर नागरिक तुम्हाला मत देती. त्यामुळे पुन्हा सत्तेत याल, असं पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेवरही कटाक्ष साधला. ब्रिटिशांनी मुंबईत सगळं केलं. म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला. राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. शिवसेनेनं मुंबईत काय केलं? त्या आधी पालिकेत काँग्रेसची सत्ता होती, असा टोला त्यांनी लगावला. शहरात मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. मीही वाहतूक कोंडीत अडकलो आणि कोरोना नाही काय की असं वाटलं. कारण गर्दी तेवढी होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यासाठी सहकार्य केलं. आता तिसरी लाट येऊ नये म्हणून सहकार्य करा. मात्र पुणेकर सर्व विसरून जातात. तिसरी लाट येऊ नये म्हणून बेफिकीरी कमी केली पाहिजे, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्याचे कौतुक केले. उड्डाण पुलांचा उपयोग चांगला होतो. उड्डाण पुलांची पहिली कल्पना ही नितीन गडकरींचीच होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मुंबईत उड्डाणपूल तयार केले. ते उड्डाण पुलांचे जनक मानले जातात. त्यांनी ५५ उड्डाण पूल बांधून मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता केली. या उड्डाण पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button