नीतू कपूर आणि वरुण धवनने केले काम सुरु

Neetu Kapoor - Varun Dhawan - Kiara Advani - Anil Kapoor

दहा दिवसांपूर्वी अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे समोर आले होेते. चंदीगढमध्ये ‘जुग जुग जियो’ सिनेमाच्या शूटिंगला गेले असता सिनेमाच्या दिग्दर्शकासह अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले होते. कोरोनाची लागण झाल्याने नीतू कपूर आणि वरुण धवन मुंबईला परतले होते. परंतु आता हे दोघेही कोरोनामुक्त झाले असून ते सिनेमाच्या शूटिंगसाठी शुक्रवारी चंदीगढला रवाना झाले. विमानात बसण्यापूर्वी मुंबई एअरपोर्टवर या दोघांनी फोटोग्राफर्सना पोजही दिली. यावेळी अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कियारा अडवाणीही (Kiara Advani) उपस्थित होते.

नीतू कपूरला कोरोना झाल्यानंतर मुलगा रणबीरने चार्टर्ड फ्लाईटने नीतू कपूर यांना मुंबईला आणले होते. मात्र त्यांना झालेली कोरोनाची लागण तीव्र नसल्याने काळजी करण्यासारखे कारण नव्हते. वरुणचेही तसेच होते. त्यामुळे आठ दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा कोरोनाची टेस्ट केली तर ती निगेटिव्ह आली. त्यामुळेच या दोघांनी पुन्हा चंदीगढला जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला.

या दोघांसोबत मनीष पॉल आणि सिनेमाचा दिग्दर्शक राज मेहता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता सगळेच कोरोनामुक्त झाले असल्याने ‘जुग जुग जियो’ची शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER