अयोध्येतील राम मंदिराच्या कामाने धरला वेग; दोन पाळीत कामाला सुरुवात

Ayodhya Ram Temple Work

अयोध्या : कोरोना संकट असूनही, रामनगरी अयोध्येत भगवान श्री रामाच्या मंदिराच्या बांधकामासाठी पूर्ण तयारी केली जात आहे. मागील महिन्यात कोरोना संकट (Corona crisis) अधिक गडद झाल्याने मंदिराचे बांधकाम रखडले होते; परंतु श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सुनिश्चित केले की, पायाचा प्रत्येक थर ७२ तासांत तयार होईल. प्रत्येक थर एक फूट आहे; परंतु दबाव दिल्यानंतर ११ इंच राहील. गेल्या बुधवारपासून या लक्ष्याला गाठण्यासाठी प्रत्येक्ष कामाला सुरुवातही झाली आहे.

अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराच्या बांधकामात असलेल्या कामगार संघटनेच्या कर्मचार्‍यांनी एकाऐवजी दोन पाळीमध्ये दिवसरात्र काम सुरू केले आहे. आता प्रत्येक थर तयार करण्याचे काम ७२ तासांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी मंदिराचा पाया पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिरासाठी लागणाऱ्या परकोटाचीही तयारीही सुरू झाली आहे. या कामाला आवश्यक वेग देण्यासाठी, तीर्थक्षेत्र न्यास ट्रस्टने बालाजी कन्स्ट्रक्शन या राजस्थानातील बांधकाम क्षेत्रातील नामांकित एजन्सीला काम दिले आहे, तर एल अँड टी आणि टाटा कन्सल्टन्सीसारख्या उच्च प्रतिष्ठित कंपन्या मंदिराच्या कामात मदत करत आहेत. सुरुवातीपासूनच एल अँड टीने दोन मोठे प्रकल्प सुरू केले आहेत, तर बालाजी कन्स्ट्रक्शनने श्री राम जन्मभूमी कॉम्प्लेक्समध्येच काँक्रीट मिक्सिंग प्रकल्प स्थापित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button