ठेकेदाराचे बिल थकल्याने रत्नागिरीच्या नव्या एसटी बसस्थानकाचे काम थांबले

Bus Stand

रत्नागिरी(प्रतिनिधी): ठेकेदाराची देयके वेळेत अदा न झाल्याने त्याने रत्नागिरीच्या जुन्या एसटी स्थानकाच्या जागी व्यापारी संकुलासह नवीन इमारत उभारण्याचे काम थांबवल्याचे निष्पन्न झाले आहे.

या नव्या इमारतीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल प्रवाशांमध्येनाराजी व्यक्त होत आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला देयके वेळेवर न मिळाल्याने त्यानेच हे काम बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी परिवहन विभागाच्या व्यापारी संकुलासह नवीन एसटी बसस्थानक उभारण्याच्या घोषणेने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. इमारतीचे काही काम पूर्ण झाले असून सुमारे ६० लाख रुपयांचे ठेकेदाराचे देयक प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER