कास धरणाचे काम सुरू होणार : खा. उदयनराजे यांची यशस्वी मध्यस्थी

udayanrajebhosale

सातारा : सातारा जिल्ह्यातील कास ग्रामस्थांनी कास धरणाचे काम बंद पाडून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. दहा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा कास ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने कास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

कासच्या ग्रामस्थांशी खासदार उदयनराजे यांनी चर्चा केली. यावेळी कास ग्रामस्थांच्या प्रमुख दहा मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन मंदिराचे काम सुरू केल्याने कास ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. कास धरणाच्या कामाला पुनःश्च सुरुवात करण्यात आली असून, मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल असे अधिकारी वर्गाने उदयनराजे यांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER