अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उच्च न्यायालयाचे काम स्थगित

Bombay High Court

मुंबई :- मंगळवार रात्रीपासूनच्या मुसळधार पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबून वाहतूक व्यवस्था कोलमडून पडल्यामुळे फारच थोडे कर्मचारी कामावर येऊ शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे मुंबईतील न्यायालयीन कामकाज बुधवारी पूर्णपणे स्थगित ठेवले.

बुधवारी ज्या प्रकरणांची सुनावणी व्हायची होती ती त्याच खंडपीठांपुढे गुरुवारी सुनावणीसाठी लावली जातील, असे न्यायालयाच्या व्यवस्थापनाने एका नोटिशीत नमूद केले. अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) व तिचा भाऊ शौविक यांनी केलेले जामीन अर्ज तसेच महापालिकेने केलेल्या पाडकामाविरुद्ध अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने केलेल्या याचिकेवरील सुनावणीही आता गुरुवारी होईल.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार ; प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER