वर्क फ्रॉम ऑफिसची एक मर्यादा, मुंबईकर ऑफिसला जाणार कसे? काँग्रेस नेत्याचा सरकारला सवाल

uddhav thackeray - Sanjay nirupam - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यात ५ टप्पे पाळण्यात आले आहे. यानुसार अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईतही काही प्रमाणात नियमावलीत शिथिलता दिली आहे. मुंबई तिसऱ्या स्तरात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दुकाने, ऑफिस आदींना वेळेची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, लोकलसह सार्वजनिक वाहतूक अगदी मर्यादित स्वरूपात सुरू ठेवली आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ठाकरे सरकारकडे (Thackeray Goverment) धाव घेतली आहे.

“मुंबईत लॉकडाऊन काही प्रमाणात हटवण्यात आला आहे. मात्र, मुंबईकरांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कार्यालये सुरू होत आहेत, पण सार्वजनिक वाहतूक बंद आहे. बसेसची संख्या वाढवली जावी किंवा लोकल वाहतूक मर्यादित सुरू करावी. वर्क फ्रॉम ऑफिसची एक मर्यादा आहे. लोक कार्यालयांमध्ये कसे जाणार?” असा सवाल निरुपम यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button