सेवा क्षेत्रातील  कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’चाही पर्याय

Work from home

नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सेवा क्षेत्रासाठी (Service Sector) प्रस्तावित ‘मॉडेल स्टँडिंग ऑर्डर’चा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात या क्षेत्रात काम करणाºया कर्मचाºयांसाठी घरून काम करणे (Work From Home ) हाही एक पर्याय त्यात देण्यात आला आहे.

संसदेने अलिकडेच मंजूर केलेल्या ‘इडस्ट्रियल रिलेशन्स कोड’च्या कलम २९अन्वये ‘मॉडेल स्टँडिंग ऑर्डर ’चा हा मसुदा तयार केला असून जनतेकडून मते व सूचना जाणून घेण्यासाठी तो राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुढील महिनाभरात लोकांना आपली मते व सूचना सरकारकडे पाठवता येतील.

‘वर्क फ्रॉम होम’ विषयी हा मसुदा म्हणतो की, सेवाक्षेत्रातील कंपन्यांचे व्यवस्थापन त्यांच्या त्यांना योग्य वाटेल त्या कर्मचार्‍यांना योग्य वाटेल तेवढा काळ घरून काम करण्याचा पर्याय देऊ शकेल. मात्र याचा स्पष्ट उल्लेख नोकरीचे नियुक्तीपत्र किंवा करारात केला जावा, असे बंधन असेल.

या ‘मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स’ अंतिमत: प्रसिद्ध झाल्यावर देशभर लागू होतील. सर्व खासगी कंपन्या व कार्यालयांना त्यांचे कार्यालयीन कामाचे नियम त्यानुसार तयार करणे बंधनकारक असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER