“वर्क फ्रॉम होम ? नव्हे वर्किंग होम्स !”

WFH

एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करणारी कविता . ऑनलाईन क्लासेस साठी मुलांची आवराआवर, स्वयंपाक , मुलांची चारीठाव भुकेची तयारी करून ठेवणे, हे सगळे केल्यानंतर हाती असलेला प्रोजेक्ट पूर्ण करायला बसताच, कधी विज गुल होते .तर कधी नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही.. ! दररोज नवीन प्रश्न .

ऑफिस सुरू असताना आठ तास केली जाणारी नोकरी ,आता बारा तासापेक्षाही जास्त होते आहे. कधी सकाळी ,तर कधी रात्री उशिरा ऑनलाईन मीटिंग, प्रोजेक्ट करावे लागत आहेत.

त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या प्रोफेशनल व्यक्तींचा ताण 20 टक्के अधिक वाढला आहे हा निष्कर्ष पुण्यातील टाटा सोल्ट लाईट या संस्थेतर्फे काढण्यात आला. संस्थेने देशातील दहा महानगरांमध्ये (मुंबई, पुणे ,दिल्ली ,बंगलोर ,चेन्नई, हैदराबाद ,अहमदाबाद, लखनऊ, चंदीगड, कोलकत्ता ) विविध क्षेत्रात, वर्ग फ्रॉम होम करणाऱ्या ,प्रत्येकी दोनशे नोकरदारांचे सर्वेक्षण केले .

कोरोनाच्या प्रसाराच्या भीतीने मार्च महिन्यापासून विविध क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांना” वर्क फ्रॉम होमची” सुविधा दिली खरी ,पण याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यावर होतो आहे.

यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ,आधी वर्क फ्रॉम होम हे कधीकधी सोय म्हणून म्हणजे घरातील काही दुरुस्ती करायची आहे, सिलेंडर येणार आहे किंवा इतर काहीही घरातील महत्त्वाचे काम ,मुलांसाठी वेळ द्यायचा आहे अशा कामांसाठी केले जायचे .तोपर्यंत ते ठीक होते, बरे वाटायचे. पण म्हणतात ना ! “घी देखा, लेकीन बडगा नही देखा !”तशी आता अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना तसेच झाले आहे. मुळातच “वर्क फ्रॉम होम” मध्ये ,वर्क आणि होम यांच्यातील सीमारेषा, बॉर्डर लाईनच पूर्णपणे पुसली जाऊन सगळीकडे फक्त “वर्किंग होम “तयार झाली आहेत.

खरंतर या सगळ्यात प्रत्येकाला जास्त ताण येतो आहे ,तो म्हणजे स्वतःला prove करण्याचा ! प्रत्येकच कंपनी आज आपली प्रॉटडक्टिविटी पडू न देण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच आपण जास्तीत जास्त प्रॉडक्टिव कसे ?हे दाखवण्याचे’ प्रेशर ‘प्रत्येकावर आहे .नाहीतर कंपन्या ‘ लेआॅफ ‘ देण्याची भीती कायम मानगुटीवर ! कुठल्याही कंपनींना आपल्या कर्मचाऱ्यांना बद्दल एका लिमिट पर्यंत आस्था असतेच. ती ते वेळोवेळी दाखवतातही ! पण शेवटी महत्त्वाची आहे ती त्यांची प्रॉटडक्टिविटीच ! आणि मुळातच आज भरपूर उद्योगांवर संकट आले आहे .उदाहरणार्थ ॲडव्हर्टायझिंग फिल्ड ! ते रस्त्यावर फारसे होर्डिंग लावत नाही आहेत कारण रस्त्यावर ते वाचायला फारशी गर्दीच नाही. मोठमोठी रेस्टॉरंट,थीएटर्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये फारशी गर्दी नाही किंवा ते बंद आहे. त्यामुळे “अस्तित्वासाठीचा झगडा” म्हणावा ,तसं प्रत्येकाच्या मानगुटीवर जू असल्याप्रमाणे काम करावे लागते आहे.

आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, अगदी आत्ताच नोकरीला लागलेल्या मुलांचा. ज्यांची वय साधारणता 24 ते 30 आहेत. यांचा प्रश्न वेगळाच आणि फार मोठा आहे तो म्हणजे :

एकटेपणाची जुळवून कसं राहायचं? हे लोक आपापल्या घरापासून कामानिमित्त दूर आहेत, त्यांची लग्न झालेली नाहीत, ज्यांचे स्टेबल पार्टनर नाहीत असे हे लोक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बारा-बारा तास काम करून स्वतःला prove करणे, बाहेर जायचं नाही ,घरात बोलायला कोणी नाही, त्यात आणखीन घराची झाड -पूस आणि इतर व्यवस्था करायची, कामाची बाई येत नाही, डबे नाही बाहेरच फुड किती दिवस खाणार? ही खूप मोठी समस्या आहे या मुला-मुलींची ! हे सगळे डिप्रेशनच्या काठावर उभे आहेत ! केव्हा डिप्रेशन मध्ये जातील याचा नेम नाही. त्यांची संख्या खूप आहे.

मुख्य म्हणजे कामाचं स्वरूप खूप lengthy होते आहे ,या प्रकारात! ऑफिसमधल्या ऑफिसमध्ये जे परस्पर कम्युनिकेशन होतं ते आता छोट्या छोट्या कामांसाठीही फोन कॉल्स होतात. कम्युनिकेशन नीट न झाल्यास त्याचा कामावर परिणाम होत राहतो आणि कामे वाढतात. पुन्हा दिवसभर अशा कॉल्स वर राहिल्याने मुख्य काम बाजूला राहतात आणि ती सुरू होतात संध्याकाळनंतर! वरती दिवसभर फोन कॉल्सवर राहून नंतर कुणाशी बोलायची ,कुणाचे ऐकायची शक्ति दिवसभरानंतर संपते. मानसिक थकवाही त्यामुळे खूप वाढतो.

जाण्या-येण्याची दगदग पूर्वी व्हायची खरी ! पण त्या निमित्ताने थोडे चालणे,लोकल ,बस साठी होणारी धावपळ होत असे. आता मात्र बारा बारा तास एका ठिकाणी, एकाच स्थितीत ,तेही चुकीच्या पद्धतीने बसून काम केल्यामुळे मान ,पाठ यांची दुखणी वाढत आहेत. सध्याच्या घरांमध्ये जी स्टडी टेबल किंवा लॅपटॉपवर वर काम करण्याची सोय होती, ती एकावेळी एकजण काम करू शकेल अशी होती. आता एकाच वेळी मुलांचे क्लासेस आणि त्याच वेळी दोघेही नवरा बायको जर घरून काम करत असतील ,तर कुठेतरी अयोग्य पोझिशनमध्ये लॅपटॉप घेऊन बसणे सोईचे होत नाही, तर कधी लॅपटॉप आलटून पालटून देखील वापरावे लागतात.

अनेक वर्षांपासूनचे रुटीन बदलून ,ऑफिसचे काम व घरातील काम अशी दुहेरी कसरत करावी लागते. त्यामुळे शारीरिक आणि विशेषतः मानसिक थकवा खूप वाढतो आहे. एकाच वेळी मुलांच्या ऑनलाईन क्लासेस कडे लक्ष देणे ,होमवर्क करून घेणे ,शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष देणे ही अतिरिक्त कामे वाढली. सकाळी उशिरा कामाला लागल्यामुळे रात्री जास्तीची कामे करावी लागतात. शिवाय पाहुणे व इतर कामांमुळे चिडचिडेपणा वाढते आहे. वर्किंग वुमेनकडून कुटुंब व ऑफिसच्या अपेक्षा वाढल्याने राग ,ताण वाढला आहे.

एकूणच ताण वाढायला इतरही जबाबदार गोष्टी ,म्हणजे योग्य वाय-फाय आणि नेट कनेक्टिव्हीटी न मिळणे, सतत स्क्रीन समोर बसून कंटाळवाणे होणे, अचानक इंटरनेट बंद पडणे, फोनची चार्जिंग संपणे, फोनवर स्पष्ट आवाज न येणे ,सुट्टीच्या दिवशी काम देण्यात येणे ,इमर्जन्सी विषय सांगून रात्री उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले जाणे, याशिवाय कधीही येणारा सध्याचा पाऊस आणि त्यामुळे होणारी वीज कपात.

याचा परिणाम वर फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर, पत्नी ,आई-वडील, मुले यांच्यावरही होतो आहे. घरात स्टडी टेबलवर मुले ,हॉलमध्ये नवरा कामे करतात. त्याचे व्हिडिओकॉल सुरू झाले की घरात आवाज अगदी स्वयंपाकाचा ,भांड्यांचा, भाजी कापण्याचा, अहो अगदी पूजेच्या घंटीचाही ,आवाज करता येत नाही .नेमकी दारावरची बेल त्याचवेळी वाजते .कामावर येणाऱ्या कामवाल्याना पण बरेच घरी येऊ देऊ शकत नाहीत असं ऐकिवात आहे, कारण सरांचे कॉल्स असतात. यु .एस .ए .वगैरेचे मेजर कॉल जर असतील ,तर त्यांच्या वेळेप्रमाणे जेवणाच्या वेळा बदलतात, त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी घरातील कामे, होणारे आवाज, मिक्सरची कामे आटपून घ्यावी लागतात .आयांचे फोन्स ,टॅब मुले वापरतात .अशा या गोंधळात टीव्हीचे तर नावच घ्यायला नको , पुन्हा बाहेर फिरायची पण सोय नाही. घरात लहान बाळ असेल तर मग विचारायलाच नको, किंवा तीन चार वर्षाची मुले असतील तर मग त्यांना घेऊन एका खोलीत खेळवत बसायचं! एकूणच त्यामुळे घरातील गृहिणी आणि वृद्ध माता पिता यांना अगदी,” घर हे बंदिशाळा” म्हणायची वेळ आली आहे !

त्यावरचे उपाय आपण आपल्या शोधायला लागणार आहेत. दिवसभरात आठवणीने भरपूर पाणी पिणे, थोड्या थोड्या वेळानंतर उठून खोलीत चकरा मारणे , आळोखे पिळोखे देणे, डोळे मिटून मागे मान टाकून, पाच मिनिटे रिलॅक्स होणे, दूरच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करून नंतर जवळची वस्तू पाहणे असा डोळ्यांसाठी व्यायाम करणे, शक्यतोवर जेवणाची वेळ टळू न देने, किंवा थोड्या-थोड्या वेळाने ब्रेक घेऊन मध्ये न्यूट्रिशियस फूड खाणे असे प्रयत्न आपण करू शकतो. सूर्यनमस्कार हा सर्वांग परिपूर्ण व्यायाम आहे. तो सकाळ-संध्याकाळ आणि दहा मिनिट मेडिटेशन हे खूप गरजेचे आहे.
आपल्या एकेकट्या राहणाऱ्या अशा ओळखीच्या तरुण मुला मुलींसाठी आपण एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांना मेसेज टाकणे, वेळ विचारून फोन करणे आणि कॉन्टॅक्टमध्ये राहणे खूप गरजेचे आहे.

याशिवाय गृहिणीनी हाच वेळ आपल्याला ,नवीन कला शिकण्यासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी मिळाला आहे असे समजून, वाचन वाढवून ,आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काही प्लॅन्स करून, त्यासंबंधी कौशल्य मिळवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करून घ्यावा !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER